पर्वतीवरील सुर्योदय

आज बरेच दिवसांनी पर्वतीला गेलो. थोड्याशा चढणीनेच दम काढला. पण छान वाटल. सुट्ट्यांमुळे भरपूर गर्दी होती. माझ्यापेक्षाही जास्त दमलेले आणि प्रत्येक पायरी चढल्यावर उभे राहून हाशहूश करणारे खूप लोक होते. त्यामुळे आणखी बरं वाटल. आता पर्वतीच्या कोणत्याही बाजूने पाहिले तर इमारतीच इमारती दिसतात. पंधरा वीस वर्षांपूर्वी उत्तरेला जरी इमारतींची गर्दी दिसली तरी दक्षिण आणि पश्चिमेला सगळी हिरवाई दिसायची. मात्र पर्वतीवर वाहणार वार मात्र अजून पुर्वीसारखंच आहे.

पेशव्यांच्या आणि अर्थातच पुण्याच्या इतिहासात पर्वती फार महत्वाचे स्थान बाळगुन आहे. खर पहिल तर एक लहानशी टेकडी, पण त्यावर उभी राहिलेली मंदिर, त्या काळाच्या हिंदुस्थानातील बडे प्रस्थ असणाऱ्या पेशव्यांची आवडती वास्तू म्हणून पर्वती नावारूपाला आली. पानिपनच्या जखमा आजही मराठी मनात भळभळतात. ती जखम अगदी ताजी असताना नानासाहेब पेशव्यांनी `भाऊ, भाऊ, म्हणत पानिपतावर मारल्या गेलेल्या आपल्या मुलाच्या, चुलत भावाच्या आणि असंख्य मराठी वीरांच्या मृत्यूने कासावीस होत पर्वतीवर हंबरडा फोडला. आणि याच दुखावेगाने त्यांनी प्राणत्याग केला. त्यामुळे पानिपतच्या दारुण पराभवाबरोबर पर्वतीचे नाव जोडले गेले आहे. आज तिथे पानिपतावर मारल्या गेलेल्या काही शुरवीरांच्या नावांची यादी पाहायला मिळाली. सर्व जातींचे, सर्व धर्मांचे, वेगवेगळ्या प्रांतातील लोकांनी पानिपतावर आपला जीव अर्पण केला. पर्वतीवर गेल्यावर ही आठवण जरुर काढली पाहिजे.

पर्वतीवरील पेशवेकालीन मंदिरे आजही सुस्थितीत आहे. इतर किल्ल्यांसारखी परवड पर्वतीच्या वाट्याला आली नाही हे एक सुदैवच. नानासाहेबांच्या समाधीचे आज जाऊन दर्शन काही घेतले नाही. पण इतिहासाची थोडीफार जाण असणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाला पर्वती हळवं करते हे मात्र नक्की.

पर्वतीवरून दिसणारे पुणे शहर आणि सुर्योदयाचा फोटो माझ्या मोबाईलमधून काढला आहे. माझी फोटोग्राफी भिकार आहे हे मला माहिती आहे. पण यावरही निर्सगाने मात केलेली आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s